Lets Explore,
Cover of Mirror Work : 21 Days to Heal Your Life मिरर वर्क

Mirror Work : 21 Days to Heal Your Life मिरर वर्क

(Paperback)

Louise L. Hay,

Saket Prakashan Pvt Ltd (Publisher)

Published
2020
Reviews
0

Ships within 1-2 days

255.00
262.00
3% off
1
मिरर वर्क म्हणजे आरशासमोर उभे राहून स्वत:च्या डोळ्यांत खोलवर पाहत मोठ्या आवाजात दिल्या जाणार्‍या प्रभावी स्वयंसूचना. आपल्या स्वत:बद्दलच्या भावना आणि प्रतिमा आरसर तुमच्याकडे परावर्तित करतो. स्वत:रौशनदानी साधलेल्या या संवादामुळे आपल्या भावनांची धारा तसेच विचारांचा प्रवाह कुठे वाहता आहे, कुठे अवगुंठित आहे याचे भान जागृत होते. जीवनाच्या कोणत्या बाबतीतील विचारांना बदलण्याची, परिवर्तन करण्याची गरज आहे याची जाणीव होते. आपल्या जीवनाला परिपूर्णतेचा स्पर्श होतो आणि आनंदाचा बहर येतो. मिरर वर्क म्हणजे स्वत:चे सुंदर स्वरूप समजून घेण्यासाठी, परिवर्तनाच्या बीजांची पेरणी करण्यासाठी स्वत:ला दिलेली अमूल्य देणगी होय.. Review "या पुस्तकानं माझं अवघं आयुष्यच बदलून टाकलंय."-टोनी जेम्स "स्वतःवर प्रेम करायला शिकवणारं अप्रतिम पुस्तक."-ट्रूडी इव्हान्स "लुईस हे यांचं कार्य अतिशय प्रेरणादायी आहे."-व्हीव्हीयन टॉब About the Author लुईस एल. हे लुईस एल. हे या विश्वविख्यात मार्गदर्शक असून ‘बेस्टसेलर’ ठरलेल्या 30 पुस्तकातंच्या लेखिका आहेत. आजपर्यंत लाखो लोकांना त्यांनी स्वत:मधली शक्ती, आत्मभान आणि सामर्थ्य यांचा शोध घेण्यासाठी मदत केली आहे. जगातील निरनिराळ्या 26 भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले असून, 35 देशांमध्ये ती पुस्तके उपलब्ध आहेत. पुस्तकांबरोबरच लुईस हे यांनी अनेक सीडीज्, डीव्हीडी प्रोग्रॅम्स, कार्ड डेक्स, ऑनलाइन कोर्सेस् आणि इतर अनेक साधने निर्माण केली; ज्यांचा उपयोग जगभरातील लोकांना आनंदी, निरोगी, स्वास्थ्यपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी होतो.डॉ. रमा मराठे डॉ. रमा मराठे M.D.M.B.A., M.Sc. Ph.D. (Psychology) डॉ. रमा मराठे विख्यात डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ, लेखिका आणि कवयित्री आहेत, त्यांनी लिहिलेल्या 'औषधाविना आरोग्य' व 'ब्रेन प्रोग्रॅमिंग' या पुस्तकांची केंद्र सरकारच्या 'भारतीय भाषा संस्थान', म्हैसूरद्वारा भारतभर वितरणासाठी निवड करण्यात आली. भारतातील अनेक शहरांत मानसशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना सुगमरीतीने स्पष्ट करणारी व्याख्याने व कार्यशाळा त्या घेत असतात. त्यांच्या आकाशवाणी, दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम व मुलाखती झाल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच कथाकथनाचे व स्वरचित काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रम झाले आहेत. विश्व इन्स्टिट्यूट ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजीतर्फे विद्यार्थी, पालक, शिक्षक, उद्योजक, इंडस्ट्रीज या सर्वांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून समुपदेशन, व्याख्याने आणि कार्यशाळा; तसेच वैयक्तिक मानसशास्त्रीय चाचण्या, करिअर व व्यक्तिमत्त्वविकास याविषयी डॉ. रमा मराठे मार्गदर्शन करतात. email: drmaethel@gmail.com, drmarthel@rediffmail.com.

More books by Louise L. Hay

Similar Products

Vidya AI