Lets Explore,
Cover of Mantarlele Divas

Mantarlele Divas

(Paperback)

Saket Prakashan Pvt Ltd (Publisher)

Published
2021
Reviews
0

Ships within 4-6 days

208.00
214.00
3% off
1

गदिमांच्या या आत्मपर लेखांचे स्वरूप स्मरणरंजनात्मक; परंतु ललितरम्य आहे. पूर्वायुष्यातल्या आठवणी जागवताना ‘त्या सगळ्याच घटनांत एक आगळी मौज होती’, असे गदिमांनी म्हटले आहे. ते सारे दिवस मंतरलेले होते. अवघड असले तरी उभारीचे होते. संस्कारांचे होते, जडणघडणीचे होते, उत्साह आणि उमेद वाढवणारे होते, असा भाव या संग्रहातल्या लेखांतून व्यक्त होतो. निवेदनातला ऐसपैसपणा आणि खुलेपणा त्यांच्या उमद्या स्वभावावर प्रकाश टाकतो. ग. दि. माडगूळकरांचे हे लेखन विलोभनीय असून त्यातला ताजेपणा, भाषेचा मराठमोळा सुगंध मनाला मोहवतो. त्यांच्या भाषेतला ओढा, चित्रमयता आणि नादमधुरता वाचकाला गुंगवून टाकते. व्यक्ती, प्रसंग, घटना जिवंत करणारी सर्जक प्रतिभा मनाला भावते. गतकाळातील स्वत:च्या मन:स्थितीचे अचूक वर्णन करताना त्यांची लेखणी विलक्षण संयम धारण करून व्याकूळ भावस्पंदने उमटवते. चराचरातील अमूर्त किंवा जडभौतिक तत्त्वांनाही माडगूळकरांच्या लेखणीतल्या विजेचा स्पर्श लाभला की, ती तत्त्वे सजीव-समूर्त होऊन वाचकांसमोर अवतरतात. - अविनाश सप्रे About the Author गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत प्रसिद्ध आहेत. संत कवी नसले तरी त्यांचे गीत रामायण फार लोकप्रिय आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून दीडशेहून अधिक मराठी आणि कथासंवादकार म्हणून पंधरा हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी त्रकथाही पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत (तीन चित्रकथा, १९६३). युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते, त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांपैकी काही अशी : कविता-जोगिया (१९५६), चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह-कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी-आकाशाची फळे (१९६०). आत्मचरित्रपर-मंतरलेले दिवस (१९६२), 'अजून गदिमा' आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१)

Vidya AI